उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चेंबूरमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा
मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बेस्ट समितीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्यावतीने १० वी व १२ वी परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच उत्साहात पार पडला
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रमोद शिंदे,आचार्य- मराठे काॅलेज प्राध्यापिका लेले मॅडम, नवाकाळचे उपसंपादक शंकर कडव,चेंबूर विधानसभा संघटक संजय नटे,अणुशक्तीनगर विधानसभा संघटक निमीष भोषले,उपविभाग प्रमुख महेंद्र नाकटे,अणुशक्तीनगर विधानसभा सहसंघटक गणेश पाटील,महिला उपविभाग संघटिका सुलभा पत्याने,चेंबूर नागरिक सहकारी बँक संचालक व समाजसेविका मिनाक्षी पाटणकर,शाखाप्रमुख उमेश करकेरा,महिला शाखा संघटीका योगिता म्हात्रे,ज्येष्ठ शिवसैनिक शशिकांत घाग, कार्यालय प्रमुख मारूती वाघमारे, युवासेना मुंबई समन्वयक डाॅ.अजित गावडे, युवासेना विभाग अधिकारी दिपेश चव्हाण,युवासेना चेंबूर विधानसभा समन्वयक विनय साठले, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संयोजन घाटले गांवदेवी उत्कर्ष मंडळ आणि दी माँ फाऊंडेशनने केले,तर सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी गणेश मिरगुले यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले.


0 टिप्पण्या