कल्याण-डोंबिवली पालिकेचे माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांचे निधन

कल्याण-डोंबिवली पालिकेचे माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांचे निधन
डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेतील शिवसेनेेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक वामन सखाराम म्हात्रे यांचे रविवारी रात्री येथे हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

१९९५ मध्ये कल्याण डोंबिवली पालिकेत लोकप्रतिनिधी राजवट आली. या काळापासून तीन वेळा ते पालिकेत नगरसेवक, तीन वेळा स्थायी समिती सभापती होते. सभापती असताना विकासाची अनेक कामे मंजूर केली. शिवसेनाप्रमुख, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विश्वासातील एका निष्ठावान शिवसैनिक म्हणून वामन म्हात्रे यांची ओळख होती.

वामन सखाराम म्हात्रे हे तीन वेळा ते पालिकेत नगरसेवक, तीन वेळा स्थायी समिती सभापती होते.

 सखाराम म्हात्रे यांचे  दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवार दिनांक २४/०७/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता त्यांच्या डोंबिवली पश्चिम येथील राहत्या घरातून काढण्यात आली.
 त्यांच्या दुःखात डोंबिवलीतील समस्त शिवसैनिक पदाधिकारी सहभागी झाले होते.
मृतात्म्यास चिरशांती मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या