माणूस निराळा व्यक्ती. प्रसिद्धी पासून दूर राहणारी व्यक्ती

 




प्रतिनिधी:भालचंद्र माने .नेरूळ, नवी मुंबई

माणूस निराळा व्यक्ती. प्रसिद्धी पासून दूर राहणारी व्यक्ती श्री. सुरेश निलाटकर. आज 16 जुलै. वयाची 75 वर्षे पूर्ण करत आहे .इतका मोठा सुवर्णक्षण आपल्या आयुष्यातील .आपल्या सुविद्य पत्नी सौ. जयश्री निलाटकर. ह्या  ऑल इंडिया रेडिओ  तसेच दूरदर्शन मुंबई नागपूर निवेदिका. चिरंजीव श्री .समीर निलाटकर मोठ्या कंपनीत उच्च पदावर मार्केटिंग क्षेत्रात आहेत.आपली लाडकी कन्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ.  सारिका निलाटकर नवाथे .आपले जावई कौन बनेगा करोडपती सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या कार्यक्रमातील प्रथम विजेता श्री. हर्षवर्धन नवाथे. नातवंडांचे आजोबा अशा श्रीमंतीचा माणूस सर्व साधारण व्यक्तीसारखा गर्व न करता आनंदात जीवन जगतोय. त्याच्यासारखा प्रेरणा स्तोत्र आज जगात कुठे मिळेल. तरुणपणातली कारकीर्द नागपूर कारागृह तुरुंगाधिकारी असताना मोठमोठ्या गुन्हेगार तसेच आंतरराष्ट्रीय सोन्याची तस्कर करणारे  चार्ल्स शोभराज व डॅनियल वॉलकॉट गुन्हेगारांवरती वचक ठेवून नंतर भारतातील मोठ्या सरकारी बँकेतून मुख्य अधिकारी म्हणून निवृत्ती घेऊन जीवनातील सेकंड इनिंग वकिली पेशा स्वीकारून जीवनाकडे आनंदी वृत्तीने पाहून व्यतीत करणारे तीन कोट  परिधान करून आपल्यातील एक व्यक्ती जेलर, बँकर आणि वकील असे सर्वांच्या मनातील आदरणीय स्थान श्री. सुरेश निलाटकर साहेब .आपण नागपूरकर विदर्भवासी आता नेरूळ ,नवी मुंबई येथे सहकुटुंब निवासी आम्हाला अभिमान आहे. आपल्या आयुष्याच्या वाढदिवसाच्या सुवर्णक्षणी आपणांस पुढील आयुष्य निरोगी सहसोबतींसह आनंददायी राहो अशा शुभेच्छा . आपलाच एक चाहता.भालचंद्र माने. नेरूळ.नवीमुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या