भिवंडीतील तालुक्यातील शेलार येथे राहणारे साहित्यिक भटू हरचंद जगदेव यांची अंकुर साहित्य संघाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
अंकुर साहित्य संघ १९८६ पासून कार्यरत असून अंकुर साहित्य संघाचे विस्तार व कार्य वाढले असून , साहित्य सेवा, कार्य, तत्परता व साहित्य संघाप्रती निष्ठा पाहून साहित्य संघाच्या सभेत भिवंडीतील तालुक्यातील शेलार येथे राहणारे साहित्यिक भटू
हरचंद जगदेव यांची अंकुर साहित्य संघाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
लेखक जगदेव भटू यांची चार पुस्तके प्रकाशित आहेत. कवी, साहित्य संमेलनामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो त्यांचे कार्य पाहता अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष हिंमत ढाळे,कार्याध्यक्ष तुळशिराम बोबडे , सचिव सुरेश लांडे, साहित्यिक राम जाधव यांनी त्यांचा कार्याची दखल घेऊन अंकुर साहित्य संघाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
अंकुर साहित्य संघाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे ज्येष्ठ साहित्यिक शिवा इंगोळे , ज्येष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड, प्रा अनिल भालेराव, साहित्यिक विजयकुमार भोईर, अँड. प्रज्ञेश सोनावणे, साहित्यिक नवनाथ रणखांबे, कवी मिलिंद जाधव, संदीप कांबळे, नरेश जाधव , संघरत्न घनघाव, शाम बैसाणे यांनी जगदेव भटू यांचे अभिनंदन केले आहे.


0 टिप्पण्या