डोंबिवली वाहतूक विभागाकडून डोंबिवलीतील सर्व नागरिकांना आवाहन

 





काल दि.15/12/2022 रोजी डोंबिवली वाहतूक पोलीस व कल्याण डोंबिवली महानगरपालिका ई प्रभाग अधिकारी भरत पवार तसेच अतिक्रमण विरोधी पथक यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली जिमखाना परिसरातील रस्त्यावर बेवारस असणारे 07 बेवारस रिक्षा उचलून खंबालपाडा डम्पिंग ग्राउंड येथे हलविण्यात आली आहेत.


   डोंबिवली वाहतूक विभागाकडून डोंबिवलीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपली वाहने रस्त्यावर बेवारस स्थितीत अथवा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा रीतीने बऱ्याच दिवसापासून उभी असल्यास ती तात्काळ काढून घ्यावीत अन्यथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मदतीने अशी खटारा /बेवारस वाहने उचलून डम्पिंग ग्राउंड येथे हलविण्यात येतील व पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या