मुख्यमंत्री शिंदे व खासदार डॉ.शिंदे यांचा फोटो लावण्यावरून गोंधळ
डोंबिवली ( शंकर जाधव ) एकनाथ शिंदे व ४० आमदारांनी बंडाळी केल्यानंतर शिंदे गट आणि शिवसैनिक यांच्यात राज्यभर वाद सुरू आहे. डोंबिवलीत शहरातही वाद सुरू झाला असून मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास डोंबिवली मध्यवर्ती शाखेत शिंदे समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा फोटो लावण्याचा वादावरून शाखेत वाद सुरू झाला.शिवसेना शाखाप्रमुख विवेक खामकर यांनी विरोध केला असता शिंदे समर्थकांनी खामकर यांची कॉलर पकडून शाखेबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तर शिवसैनिक महिलांना शाखेत कोंडले होते.जिल्हाप्रमुख सदानंद थर वळ यांनी मध्यस्थी घेत वाद मिटवल्याचा प्रयत्न केला.मात्र शाखेत वातावरण तापल्याने पोलिसांनी शाखेत धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.ठाकरे गट व शिंदे गटातील वाद शिवसेना मध्यवर्ती शाखेत सुरू झाल्याची चर्चा रंगली होती.
डोंबिवली शिवसेना शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा फोटो डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत काढला होता.याबाबत काही दिवसांपूर्वी शिवसेना मध्यवर्ती शाखेत शिंदे गटातील समर्थकांनी शाखेत जाब विचारण्यावरून वाद झाला होता.
मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शिंदे गटातील समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा फोटो लावण्यासाठी शिंदे समर्थक गेले होते.शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख खामकर यांनी विरोध केला असता शिंदे समर्थकांनी खामकर यांची कॅलर पकडून शाखेबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.शाखेत मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ.शिंदे यांचा फोटो लावण्यात आला.याला शिवसैनिक व महिला शिवसैनिकांनी विरोध केला असता त्यांना शिंदे समर्थकांनी फोटो लावणारच असा आग्रह धरला.यात ठाकरे गट व शिंदे गटात जोरदार वाद झाल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांसह पोलीस कर्मचारी शाखेत धावत आले.मात्र गोंधळ सुरू असताना असल्याचे पाहत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.शिवसेना शहर प्रमुख खामकर, महिला पदाधिकारी कविता गावंड, वैशाली दरेकर, किरण मोंडकर, गुलाब म्हात्रे यांसह प्रकाश तेलगोटे, अजय घरत, अभिजित थरवळ, शिल्पा मोरे शाखेत होते.यावेळी जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी मध्यस्थी घेत समजावण्याचा प्रयत्न केला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
पत्रकार व पोलिसांना धक्काबुक्की
डोंबिवली शिवसेना शाखेत गोंधळ उडाल्याचे समजताच पत्रकार वृत्त संकलन करण्यासाठी पत्रकार गेले असता शिंदे समर्थकांकडून धक्काबुक्की करण्यात आली.तर पोलीस शाखेत आले असता त्यांनाही धक्काबुक्की झाली.मुख्यमंत्री शिंदे व खासदार डॉ.शिंदे यांचा फोटो लावला पाहिजे अशी भूमिका शिंदे समर्थकांनी घेतली होती. तर ठाकरे गटातून शाखेत फोटो लावण्यात येणार नाही अशी ठाम भूमिका घेतली.
-------------------------------------------------------------
दरम्यान याप्रकरणी शिंदे समर्थक नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी शिवसेना शाखेत खासदार डॉ शिंदे यांचे देखील कार्यालय आहे.नागरीक कार्यालयात कामे घेऊन येतात मात्र नागरिकांसाठी खासदार शिंदे यांना कार्यलयात येणे गरजेचे असताना त्यांना येऊ दिले जात नसल्याने त्यांना अनेकदा समज देण्यात आली होती.मात्र तरीही ते ऐकत नसल्याने आज मुख्यमंत्री आणि खासदार डॉ शिंदे यांच्या तस्वीरी लावत कार्यालय ताब्यात घेतल्याचे सांगितले.

0 टिप्पण्या