प्रहार सदैव कामगारांच्या पाठीशी - जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे



देवळाली प्रवरा - दि. २१ ऑगस्ट 

प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांचे हस्ते व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे नेतृत्वाखाली प्रहार कामगार सेलची स्थापना करणेत आली.  त्या प्रसंगी बोलताना पोटे यांनी सांगितले की प्रहार सदैव कामगारांच्या पाठीशी आहे. 

       रविवार दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वा. देवळाली प्रवरा येथील गुहा रोडच्या दत्त मंदिर प्रांगणात आयोजित छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांचे हस्ते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ कामगार सेल च्या अध्यक्षपदी बाळासाहेब कराळे, यांची तर  देवळाली प्रवरा कामगार सेलच्या अध्यक्षपदी किरण पंडित, उपाध्यक्षपदी आदिनाथ भालेकर, सचिवपदी संतोष ढेपे, सह सचिवपदी प्रमोद सांबारे, तर खजिनदारपदी राजू दळवी यांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र व बॅज देऊन सन्मानित करण्यात आले त्या प्रसंगी पोटे बोलत होते. 

       या कार्यक्रम प्रसंगी प्रहारचे जिल्हा सल्लागार पांडुरंग औताडे,  जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष लक्ष्मण खडके, प्रहार देवळाली प्रवरा महिला अध्यक्ष्या भाग्यश्री कदम, उपाध्यक्ष शिवाजी मुसमाडे, संघटक सुनील कदम,  राहुरी फॅक्टरी उपाध्यक्षा वंदना कांबळे, अफसाना शेख,  राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, उपाध्यक्ष एकनाथ वाणी, प्रसादनगर शाखा अध्यक्ष अमोल साळवे, संघटक प्रभाकर कांबळे, पत्रकार व मोठ्या संख्येने कामगार उपस्थीत होते. 

       प्रसंगी बोलताना पोटे म्हणाले की, व्यापाऱ्यांनी संप किंवा बंद पाळला की कामगारांना पगार मिळत नाही, या कामगारांचे  पोट हातावर असल्याने त्यांना त्या बंद काळात पगार त्यांना मिळाला पाहिजे, कामगारांना आठवड्यातुन एक दिवस सुट्टी मिळाली पाहिजे, माल भराई उतरायची भाव ठरवण्याचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे, कामगारांना विमा संरक्षण मिळाले पाहिजे, कामगारांच्या कामाच्या वेळा निश्चित झाल्या पाहिजे.  अश्या एक ना अनेक समस्यांना कामगारांना तोंड द्यावे लागत असल्याने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रहार कामगार सेल ची स्थापना केली आहे. यापुढे कामगारांवर होणार अन्याय आम्ही सहन करणार नाही व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे पोटे यांनी सांगितले. 

       पुढे बोलताना पोटे म्हणाले की, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात आप्पासाहेब ढुस यांच्या नेतृत्वाखाली अल्पावधीत अनेक प्रश्न मार्गी लावण्यात प्रहारला यश आले आहे, त्यामध्ये तब्बल ४० वर्षे रखडलेला पिण्याचा पाणी प्रश्न असेल, नगरपालिका सफाई कामगार प्रश्न असेल, एकल महिलांना हातगाडी देऊन व्यवसाय उभा करणे असेल, विधवा विवाह असेल, बाल संगोपन योजना असेल, विविध रस्ते असतील पूल असेल असे अनेक प्रश्न चुटकीसरशी मार्गी लागले असून कामगारांच्या प्रश्नातही आम्ही लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून देणारा आहोत. 

      प्रसंगी प्रहारचे जिल्हा सल्लागार पांडुरंग औताडे, जिल्हा संघटक बाळासाहेब खार्जुले यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन आप्पासाहेब ढुस यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या