मुंबई - जुने भांडण उकरून काढत एका तरुणाने त्याच परिसरातील तरुणावर धारदार शस्त्राने वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील कर्नाटक हायस्कूल समोरच्या स्वामी समर्थ रिक्षा स्टँड वाचनालयाजवळ घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी गोवंडी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संपत नाळे, गणेश खरचे,अमर चेढे आणि पथकांने अवघ्या काही तासांतच हल्लेखोर विशाल सुरेश माने (३४) याला गावी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मानखुर्द लल्लूभाई कंपाऊंड येथून शिताफीने अटक केली.हल्लेखोर हा माने नवी मुंबईतील खान्देश्वर येथे राहतो.तर याला हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण विलास धनावडे हा घटनास्थळापासून जवळच असलेल्या श्रमिक कामगार सोसायटीत राहतो.
0 टिप्पण्या