संत झेविअर्स महाविद्यालयाचे मराठी वाङ्मय मंडळ हे मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील सर्वात जुने मराठी वाङ्मय मंडळ आहे। पाश्चिमात्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामध्ये मराठी संस्कृतीचे जतन आणि संगोपन करणारे, शंभराव्या वर्षात पदार्पण केलेले मराठी वाङ्मय मंडळ हे विविध कार्यक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी देखील अशाच एका कार्यक्रमामुळे म.वा.म. चर्चेत आले आहे।
१५ ऑगस्ट रोजी मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटन सोहळा २०२२ हा मोठ्या दिमाखात पार पडला। या उद्घाटन सोहळ्याची संकल्पना (थीम) 'युगांतर काल आज आणि उद्या' ही होती. कार्यक्रमाला वेगवेगळे प्रमुख पाहुणे लाभले होते। कार्यक्रमाचे पहिल्या सत्र ची (स्वर संगम) सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हातून दीप प्रज्वलनाने झाली होती। कोकणची कन्या असलेल्या गायिका शमिका भिडे यांनी आपली प्रसिद्ध भूपाळी सादर करून संपूर्ण वातावरण भक्तिमय केले होते। त्याचबरोबर शमिका भिडे यांनी त्यांच्या संगीत क्षेत्राची सुरुवात कशा प्रकारे झाली याबद्दल सांगितले होते।
दुसऱ्या सत्राची सुरुवात ऑफ बीट - द धारावी ड्रीम प्रोजेक्टच्या बीट बॉक्सिंग संगीत प्रकाराने झाली। ज्यामध्ये त्यांनी विविध प्रकारे बीट बॉक्सिंग आणि हिपोप डान्सिंग करून मनोरंजन केले होते। त्यानंतर मंडळाने चित्रकलेचे प्रदर्शन ठेवले होते।
तिसऱ्या सत्रामध्ये GenZ कट्ट्याच्या अंतर्गत आपण सोशल मीडियाचा कशाप्रकारे चांगला उपयोग करून घेऊ शकतो याचे उत्तम उदाहरण मुलाखत द्वारे दिले आहे। त्यानंतर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी मल्हार कळंबे यांची मुलाखत घेण्यात आली। मल्हार कळंबे हे मुंबईतील बीच साफ करण्याचे काम करतात। २०१८-२०२२ मधे देश विदेशात विवीध पुरस्कार मिळाला आहेत।
चौथ्या सत्राची (युगांतर) सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, अभिनेते आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या मुलाखतीने झाली होती। त्यांची मुलाखत मंडळाच्या कार्यकारणी सदस्य असलेल्या अर्णव जोशी यांनी घेतली होती। नागराज मंजुळे यांना तुम्ही सैराट मध्ये गावाकडचे हीरो हीरोइन घेतले होते तर त्यामागे काही विशेष कारण आहे का? असा प्रश्न विचारला असता, यावर बोलताना त्यांनी असे सांगितले की "आपण नेहमीच रंगाने गोऱ्या दिसणाऱ्या हीरो हीरोइनला पाहत आलो आहोत, तर मला असे दाखवायचे होते की सुंदरताच म्हणजे सर्व काही नसते तर त्यामागची भावना महत्त्वाची असते। " बहु आयामी व्यक्तिमत्व असलेल्या नागराज मंजुळे यांना कविता आणि चित्रपट यापैकी तुम्हाला काय जास्त आवडते असे विचारले असता, "मला कविता लिह्यला आणि कविता वाचायला जास्त आवडते असे त्यांनी सांगितले। "
नांदी हा संगीतातलाच एक प्रकार! तर उद्घाटन सोहळ्याचा पंचतुंड नररुंड मलधर ही नांदी बालगंधर्व ह्यांच्या वेशात सादर केली गेली. त्यानंतर विविध बॉलीवूड गाण्यावरती नृत्य सादर केले गेले. त्यानंतर टिंबक्तू या नाटकाचे सादरीकरण झाले होते। अशा या विविध कार्यक्रमांचा समावेश असलेल्या उद्घाटन सोहळ्याला प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद लाभला होता।
0 टिप्पण्या