प्रवासी सुरक्षेसाठी रिक्षाचालकाने बुजवले खड्डे




डोंबिवली ( शंकर जाधव )एकीकडे काही भागात पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजविण्याचे काम  सुरू असताना दुसरीकडे अनेक रस्त्यांवरील खड्डे अद्याप बुजवले नाहीत.डोंबिवली पूर्वेकडील भोपर, आजडेपाडा व अन्य भागात खड्डे पडल्याने नागरिक प्रशासनाच्या नावाने बोटे मोडीत आहेत.मात्र एका रिक्षाचालकाने प्रशासनाच्या कामाची वाट न पाहता स्वतः खड्डे बुजवले.खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होऊन वाहनचालक व प्रवासी जखमी होऊ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हे सर्व टाळण्यासाठी रिक्षाचालकाने डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदानजवळील खड्डे बुजवले.


   शरद ठाकरे हा तरुण गेली सहा वर्षे डोंबिवलीत रिक्षा चालवतो.दरवर्षी डोंबिवलीत खड्डे हे ठरलेले असल्याने 'रोज मरे त्याला कोण रडे' म्हणी प्रमाणे चालत असे.मात्र यावर्षी प्रशासन रस्ते बनविण्यास की गंभीर दाखवते ते पुन्हा एकदा दिसून आले.डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेकडील अनेक रस्त्यांवर  खड्डे पडल्याने अनेक वाहनचालक जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.'आपला प्रवासी आपली जबाबदारी' अस ठरवत शरदने डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदानजवळील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली.शरदचे हा प्रयत्न पाहून येथील नागरिकांनी त्याचे हे समाजकार्य आपल्या मोबाईल मध्ये टिपले.तर त्याच्या मदतीला काही नागरिकही आले.

  'अनेक ठिकाणचे खड्डे प्रशासनाकडून बुजवले जात नसतील तर  संकटाची वाट पाहता आपण स्वतःहुन पुढाकार घेऊन शक्य होईल तिकडचे खड्डे बुजवा'असा एक सामाजिक संदेश या रिक्षाचालकाने दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या