आम आदमी पार्टीचे कल्याण येथे वाढलेल्या वीज दराच्या विरोधात बुधवार दिनांक १३ जुलै, २०२२ रोजी सकाळी १०:३० वा. तेजश्री कार्यालय व १२ वा. तहसिलदार कार्यालय, कल्याण (प) येथे आंदोलन.
महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या नवनियुक्त सरकारने विजेच्या दरांत भरमसाठ वाढ करून जनतेला मोठा आर्थिक झटका दिला आहे.
राज्य सरकारच्या या जनता विरोधी निर्णयाच्या विरोधात आम आदमी पार्टी कल्याण-डोंबिवली बुधवार दि. १३ जुलै २०२२ रोजी तेजश्री कार्यालय व तहसिलदार कार्यालय, कल्याण (प) येथे संविधनिक मार्गाने आंदोलन करत आहोत व मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी वीज बिल कमी करण्यासंबंधी मा. तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात येणार आहे


0 टिप्पण्या