जे.के.इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज जपतायत पंरपरा..
डोंबिवली ( शंकर जाधव ) आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवलीजवळील जे.के.इंग्लिश स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भोपर गावात दिंडी काढण्यात आली .दिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विठू नामाचा गजर करत रिंगण केले.यावेळी संस्थाचालक गजानन पाटील,मुख्याध्यापिका मंजुळा पाटील, ग्रामस्थ ज्ञानेश्वर माळी, माजी सरपंच काळूबुवा मढवी यांसह शाळेचे शिक्षक आणि पालकवर्ग सहभागी झाले होते.शाळेच्या आवारातुन सुरू झालेली दिंडी भोपर गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पर्यत काढण्यात आली.मंदिराच्या आवारात विद्यार्थ्यांनी रिंगण करताना परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
दिंडीत विठ्ठल रखुमाई बनलेले विद्यार्थी, पालखी घेत असताना विठ्ठलाचा जप, लेझीमवरील विद्यार्थी तर त्यांच्यावर लक्ष ठेवत असलेले शिक्षकवर्ग पाहून भोपर गाव हे जणू काही पंढरपूर झाले आहे का असे चित्र दिसत होते.

.jpeg)
0 टिप्पण्या