रायझिंग स्टार प्रि स्कुलच्या छोट्या वारकऱ्यांची दिंडी






 डोंबिवली ( शंकर जाधव ) आषाढी एकादशी निमित्त डोंबिवलीतील  रायझिंग स्टार प्रि स्कुल येथील छोट्या वारकऱ्यांनी दिंडी काढली.चिमुकल्यांनी विठू नामाचा गजर करत टाळच्या गजरात डोंबिवलीतील श्री गणेश मंदिरापर्यत दिंडी काढली.विशेष म्हणजे दिंडीत


साधना आधार वृद्ध सेवा केंद्रातील आजी सोबत पांडुरंगाचा जय घोष केला. गणपती मंदिर येथे जाऊन विठू माऊली व रखु माई यांचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी साधना आधार वृद्ध केंद्राच्या संचालिका, प्रतिभा पाटील यांसह अनेक डोंबिवलीकर सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या