डोंबिवली पश्चिम येथे श्री गांवदेवी प्रासादिक भजन मंडळाच्या १४व्या वर्धापदिन सोहळ्याच्या निमित्ताने भक्तीचा गजर 
आषाढी एकादशीचे औचित्य साधून १० जुलै २०२२ रोजी डोंबिवलीमध्ये श्री गांवदेवी प्रासादिक भजन मंडळ आणि परिवाराच्या सहकार्याने व डबल बारी भजनाचे प्रसिद्ध बुवा श्री संजय वासुदेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व भजन सम्राट श्री भगवानजी लोकरे बुवा यांच्या उपस्थितीत रविवार दुपारी ३ते रात्री १० दरम्यान मराठा मंदिर, महात्मा फुले रोड,डोंबिवली पश्चिम येथे मंडळाच्या १४व्या वर्धापदिन सोहळ्यात भक्तीचा गजर दुमदुमणार आहे
कोकणकला भूषण भजन सम्राट चंद्रकांत कदम आणि त्यांचे शिष्य भजन सम्राट भगवान लोकरे बुवा आणि अनेक नामवंत शिष्य या सोहळ्यात भजनातून आपल्या गुरूला मानवंदना देणार आहेत, या वेळी दिप प्रज्वलन मान्यवरांचे सत्कार, विद्यार्थी गुणगौरव, हळदी कुंकू आदी कार्यक्रम होणार आहेत, या वेळी भगवान लोकरे बुवा, प्रकाश चिले बुवा, सतीश राणे बुवा, संतोष नांदोस्कर बुवा,आनंद मेस्त्री बुवा, सुनील दातार बुवा, दादा परब बुवा तसेच डोंबिवली मधील आमदार रविंद्र चव्हाण आणि नगरसेवक या कार्यक्रमासाठी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत
भजन रसिकांनी या सोहळ्यास आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन श्री गांवदेवी प्रासादिक भजन मंडळ आणि परिवाराने केले आहे.

0 टिप्पण्या