माळीण गांवची करुण कहाणी

 पुणे जिल्ह्यातील माळीण गांव येथे ३० जुलै २०१४ मध्ये अतिवृष्टिने प्रचंड डोंगर कोसळुन सपुंर्ण माळीण गांव दगडमातीच्या  ढिगार्‍याखाली गाडले जाऊन नष्ट झाले .त्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.काही पुर्ण कुटुंबेच ढिगार्‍याखाली गाडल्यामुळे मृत्युमुखी पडली .गावाची अपरिमित हानी झाली .या दुर्घटनेत गांवाच्या खुणाच पुसल्या गेल्या. महाराष्ट सरकारने या गावाचे पुर्नवसन करुन  पुन्हा ६८ घरे  जिवंत राहीलेल्या लोकांना बांधुन दिली ,व पुन्हा गांव ऊभे केले .या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या माळीण गांवच्या नागरिकांसाठी ,अ.भा.मराठी साहित्य मंडळाचे कार्याध्यक्ष       कवी परशुराम नेहे  यांनी  वाहीलेली   भावपुर्ण आदरांजली  .  कविता 

 माळीण गांवची करुण कहाणी .



थेंब  थेंब डोळ्यामधुनी

 पडते टप टप पाणी । 

माळीण गांवची ऐकता 

ही करुण कहाणी ।

ऊषाःकाल होता होता 

काळ  रात्र  आली ।

सर्व  गावावर  ही 

घाला घालुनीया गेली ।।१।।

दुःख्खाचा डोंगर असा 

अचानक  कोसळला  ।

पावसा पावसा का रे 

वेड्यासारखा  बरसला ।

किंकांळ्या   टाहो 

काहीच नाही कानी आले ।

होत्याचे नव्हते सारे 

काळातच गडप झाले ।।२।।

सुखी संसाराचे स्वप्न त्यांचे 

का   दिलास   तू  दणका  ।

क्षणांतच  गाडले त्यांना ,

कंठातच अडकला हुंदका !

पाहुनी  दुःख्खाचा डोंगर ,

दुःख्खही स्वःताशी  लाजले । 

खाईत  ढकलुनी  त्यांना ,

नियती  तू  काय साधले ।।३।।

धरोनीया  घट्ट  मिठीत ,

रडुनी सुकुन गेला पान्हा ।

मृत्युच्या दाढेतही मातेने ,

सोडला नाही तिचा कान्हा । 

अस्मानीच्या रौद्र अवतारावर,

 बाळ  रुद्राने  केली  मात ।

माय लेकरांच्या वात्सल्याला ,

होती  ईश्वराची मोठी  साथ ।।४।।

राॅकेलचा टॅन्कर ,ज्वालीग्नीसाठी 

   होता  तिथे  शांत   ऊभा  ।

 अंत्य  संस्कारासाठी तिथे  अनोळखी जनांची शोक सभा ।

   कहाणी    करुण  ही ,

माळीण गांवची  जीवघेणी ।

 निरोप   देण्या ह्या जगाचा ,

नात्याचे नव्हते शिल्लक कुणी।५।

माझे तुझे म्हणु नका ,

इथे आपले नसते काही  ।

नियतिची आम्हीं खेळणी , 

क्षणाचाही भरवसा नाही ।

आमचे दोर ,तुझ्या हाती ,

तु  राखुनी ठेवलेस  देवा ।

अरे  तुच  खरा  मदारी , 

रोज खेळ नवा, नवा,

 रोज खेळ नवा,नवा ।।६।।


,

स्वरचित कवी परशुराम नेहे 

           कार्याध्यक्ष

अ.भा.मराठी साहित्य मंडळ भ्रमण ध्वनी ९९३०५९१६१७ 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या