वावे गाव नाका : तालूका - अलिबाग जिल्हा -रायगड येथे नागरिकांना होणाऱ्या त्रासबाबत अलिबाग तालूका भाजपा सेल अध्यक्ष अशोक वारगे यांचे निवेदन पत्र :-
अलिबाग प्रतिनिधी : दिनेश तुरे
अलिबाग तालुक्यातील वावे गाव हा मोठी बाजारपेठ होत आहे , परंतु भरपूर पावसाने येथील रस्त्यांची वाताहत झाली आहे, रस्त्यावर पाणी साचून नादरुस्त रस्त्यावरून दुचाकी व इतर वाहने चालविताना अडचणीचा सामना करावा लागत आहे , प्रसंगी अपघात देखील होत आहेत.छायाचित्रात दिसतच आहे , त्यासाठी पाण्याचा योग्य निचरा करून त्यावर उपाययोजना करावी यासाठी अभियंता श्री राजीवजी डोंगरे साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग रायगड यांना वावे नाका येथे गटर काढून मोरी बांधण्याबाबत निवेदन भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष श्री अशोकजी वारगे साहेब तसेच भाजपा तालुका चिटणीस श्री शरदजी थळे साहेब, याच्या मार्फत देण्यात आले यावेळी सर्वस्वी वावे ग्रामस्थ श्री महेंदजी पाटील,श्री रुपेशजी गावंड उपस्थित होते.
ग्रुप ग्रामपंचायत बेलोशी -तालुका अलिबाग हद्दीत वावे ते रेवदंडा रस्त्यावर वावे नाका येथे मोरी बंद असल्यामुळे सांडपाणी, पावसाचे पाणी व कचरा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर साठले जाते.त्यामुळे तेथील नागरिकांना व प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तसेच सदर जागेवर दुचाकी तीन चाकी वाहने चालवण्यास अडचण येते. गटारामुळे दुर्गंधी होऊन लोकांना रोगराई पसरून परिसरात त्रास होईल .
तरी आपण सदर वावे नाक्यावर ताबडतोब मोरी बसून पाण्यासाठी जाण्याचा रस्ता करावा. मोरी बंद असलेल्या जागेवर पावसाचे पाणी जमुन मोठ्या प्रमाणे खड्डा तयार झालेला आहे. त्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे तरी आपण सदर काम ताबडतोब करण्यासाठी निवेदन दिले.
जर आपण सदर काम ताबडतोब केले नाही तर आम्ही तिथे भारतीय जनता पार्टी तर्फे मोठे प्रमाणात रस्ता रोको आंदोलन केलं जाईल असे ठणकाऊन सांगणात आले
नागरिकांना त्रास कमी करण्यासाठी ताबडतोब आपण सदर गोष्टीची कारवाई करावी ही विनंती करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.


.jpeg)
.jpeg)

0 टिप्पण्या