डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्डे लवकर बुजवू...


        पालिकेचे मनसेला आश्वासन


 



डोंबिवली ( शंकर जाधव ) रस्त्यावर पडलेले खड्डे हा डोंबिवलीकरांसाठी चर्चेचा विषय झाला आहे.खड्डे चुकवत वाहन चालवताना अपघात होणार नाही याची काळजी घेत खड्डे कधी बुजतील असा प्रश्न विचारला जात आहे.मनसेने यावर आवाज उठवला असून याबाबत `ह` प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांची भेट घेतली. डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्डे लवकरात-लवकर  बुजवू असे आश्वासन पाटील यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.



 


डोंबिवलीतील रस्त्यांना पडलेले खड्डे हे जीवघेणे असल्याने प्रशासनाने अपघात होण्याची वाट न पाहता लवकरात लवकर खड्डे बुजवावे अशी मागणी मनसेने केली आहे. आमदार  प्रमोद (राजू) रतन पाटील यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत शहाराध्यक्षा मंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली उपशहर अध्यक्ष प्रेम पाटील,शहर सचिव संदीप (रमा) म्हात्रे,प्रभाग क्र ४८ बावन्नचाळ (गणेशनगर) शाखाअध्यक्ष प्रकाश भालेराव,महिला शाखाअध्यक्ष गौरी कुडतरकर, सागर मुळ्य,बागवे  आदी पदाधिकारी यांनी पाटील यांची भेट घेतली.




  यावेळी प्रेम पाटील म्हणाले, मुसळधार पावसामुळे विभागातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या झालेली दुरावस्था झाली आहे. प्रशासन फक्त थुकपट्टीची कामे करताना दिसतात.खड्डे हा विषय पालिकेसाठी जरी नवीन नसला तरी वाहनचालकांचा जीव महत्वाचा आहे याचा प्रशासनाला विसर पडला का ?, शहरातील रस्त्यावरील कचरा हा विषयही गंभीर बनत चालला आहे.यावर `ह` प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी लवकरात लवकर रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातील असे आश्वासन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या