मी गद्दारी केलेली नाही .... मी राजीनामा देणार नाही.... आमदार विश्वनाथ भोईर

 


 आमदार विश्वनाथ भोईर

 कल्याण  ( शंकर जाधव )    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देत मी गद्दारी केलेली नाही त्यामुळे मी शहरप्रमुख पदाचा राजीनामा देणार  नसल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.



 आपली भूमिका स्पष्ट  करताना आमदार भोईर पुढे म्हणाले,  आपण आजही शिवसैनिक असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला मिळणारी  वागणूक आणि मतदार संघात काढल्या जाणाऱ्या  राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल यासारखी वक्तव्ये केली जात होती. यामुळेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला  आपण पाठिंबा दिला. मात्र आम्ही शिवसेनेशी आजही प्रामाणिक असताना जर आम्हाला गद्दार ठरवले जाणार असेल तर गद्दारीची व्याख्या सविस्तरपणे मांडली जावी असेही आमदार भोईर यांनी सांगितले.  

   

   मी गद्दारी केली नाही मी राजीनामा देणार नाही. जो काही निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या