डोंबिवलीतील नवी मुंबई बस थांबा गायब पार्किंगसाठी वापरली जातेय जागा



राष्ट्रवादीने विचारला जाब 

डोंबिवली ( शंकर जाधव ) अनेक वर्षांपासून असलेला डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील वाशी बस थांबा दिसत नसल्याने प्रवाशीवर्ग आश्र्चर्य व्यक्त करत आहेत.पावसाळयात या थांब्याच्या आत प्रवासी बसची वाट पाहत होते.आता बस थांबच नसल्याने छत्री घेऊन रस्त्यावर उभे राहून प्रवाश्यांना बसची प्रतीक्षा करावी लागते.केडीएमटीने यावर लक्ष दिले नसल्याने या जागेवर अनधिकृत पार्किंग केली जात आहे.विशेष म्हणजे या जागेत पार्क होणाऱ्या दुचाकींवर वाहतूक पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र संघटक सचिव संजय पाटील यांनी केला आहे.

   डोंबिवली पूर्वेकडील शास्त्रीनगर रुग्णालयाजवळ नवी मुंबईला  शहरात जाण्यासाठी पालिकेच्या  परिवहन सेवेकडून बससेवा सुरू आहे.नवी मुंबईला जाण्यासाठी या बस थांब्यात प्रवासी उभे राहत होते. या बस थांब्याला छत असल्याने प्रवाश्यांना बसची प्रतीक्षा पाहत रस्त्यावर उभे राहण्याची वेळ आली नव्हती.मात्र काही दिवसांपूर्वी येथील बस थांबच गायब झाल्याने पाटील यांनी याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली आहे.

  राष्ट्रवादीचे पदाधिकारी पाटील यांनी डोंबिवली वाहतुक नियंत्रण उपशाखेशी संपर्क केला असता सदर ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकींवर टोइंग व्हॅन नसल्याने कारवाई  करू शकत नसल्याचे उत्तर दिले.यावर पाटील यांनी वाहतूक पोलीस शहरातील अनधिकृत पार्किंगकडे एकप्रकारे कानाडोळा करत असल्याचे दिसत असल्याचा आरोप केला. दरम्यान या ठिकाणी केडीएमटीने प्रवाश्यांच्या होत असलेल्या गैरसोयकडे लक्ष देत अनधिकृत पार्किंग हटवून बस थांबा बनवावा अशी मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या