डोंबिवलीतल्या गणेश घाटावर ज्येष्ठ नागरिकाची स्टंटबाजी..
डोंबिवली ( शंकर जाधव ) आतपर्यत तरुणांना स्टंटबाजी करताना आपण पाहिले असेल.मात्र डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली गणेशघाट येथे चक्क ज्येष्ठ नागरिकच स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमात व्हायरल होत आहे.विशेष म्हणजे मुसळधार पाऊस पडताना गणेश घाट विष्णूनगर पोलिसांची गस्ती नसल्याने स्टंटबाजी करण्यास नागरिक घाबरत नसल्याचे दिसते.
एकीकडे मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली बेफान सोडून काढले आहे खाडीचा किनारपट्टा आणि खाडी पासून जवळपास 100 मीटर अंतर जलमय झालेले असतानाच डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली गणेश घाटावर काही ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी गेले होते. येथील एका ज्येष्ठ नागरिक
स्टंटबाजी सुरू असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला आहे.एकीकडे तरुणाईला स्टंटबाजी करताना आपण पाहिले आहे ,मात्र चक्क जेष्ठ नागरिक आहे स्टंटबाजी करताना आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे हा स्टंटबाजीचा व्हिडिओ
सर्वत्र व्हायरल केला आहे. यात एक ज्येष्ठ गणेश घाटावर लावलेल्या लोखंडी रेलिंग वर बसून मज्जा लुटताना दिसत आहे. तर दुसरीकडे काही जण त्याला हसून खेळून प्रोत्साहन देताना दिसत आहेत गणेश घाट परिसरात पाण्याने तुडुंब भरला आहे. अशावेळी हे जेष्ठ नागरिक आपला जीव धोक्यात घालून या लोखंडी रेलिंग वर आणि कठड्यावर स्टंटबाजी करताना आढळून आले आहेत पोलिसांनी या संदर्भात कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.


0 टिप्पण्या