लातूर जिल्ह्यातील धनेगाव येथील कवी गणेश तुकाराम पुंडे यांना "शून्य से शिखर तक फाउंडेशन अंतर्गत दिला जाणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न सन्मान २०२२ जाहीर झाला आहे अशी माहिती शुन्य् से शीखर तक फ़ाउंडेशन च्या ( CEO founder chander Kala Singh ) चंद्रकला सिंग यांनी दिली आहे
सदर पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2022 रोजी खास मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे..!!
गणेश तुकाराम पुंडे हे ग्रामीण भागातील कवी असून अतिशय खडतर प्रवास करत त्यांनी आपले नाव उज्वल केले आहे त्यांनी सामाजिक शैक्षणिक सहित्यिक क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. वादळ मनातलं त्यांचा पहिला काव्य संग्रह असून त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सलग तीन वेळा सहभाग नोंदवला अशी. आतापर्यन्त अनेक राज्य स्तरीय राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कवी संमेलनात सहभागी झाले आहेत त्यांना राज्य स्तरीय साहित्य साधना, साहित्य रत्न, साहित्य सेवा, याबरोबरच अनेक पुरस्काराने गौरावण्यात आले आहे.नुकतच झिरो ते हिरो एक प्रवास या राजेश दिवटे लिखित प्रेरणादायी पुस्तकात त्यांचा जीवनपरिचय प्रकाशित करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यांची दखल घेऊन भारत सरकार च्या माई स्टॅम्प अंतर्गत 2020 साली टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे.अमेरिकेच्या नासा या अंतराळ सन्शोधन केन्द्रातर्फे मार्स मिशन जुलाई 2026 मधे जगातील काही निवडक मान्यवरांची नाव व माहिती , चिप वर एचिन्ग करुन, मंगल ग्रहावर पाठ विणार आहेत. त्यात, विश्व शान्ति दूत डा सुधीर तारे यांच्या * शून्य से शिखर तक* मधील व्यक्तीं ची ही निवड झाली आहे. त्यातीलच एक नाव , ग्रामीण मराठी कवी , गणेश पुंड़े, आहे. नासा ने गणेश पुंड़े यांचा बोर्डिंग पास जारी केलेला आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे


0 टिप्पण्या