आषाढी एकादशीचे औचित्य साधत डोंबिवलीत रंगली श्रीविठ्ठल नामाची अभंगधारा


श्री गावदेवी प्रासादिक भजन मंडळच्या १४ वा वर्धापन दिन 
उत्साहात साजरा झाला 




लोकसत्यवाणी न्युज

(डोंबिवली : 10 जून 2022)

 

        गावदेवी प्रासादिक भजन मंडळाने मराठा मंदिर डोंबिवली पश्चिम येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधत 14 वा वर्धापन दिन भव्य कार्यक्रमांनी पार पडला. 


  

        सुरुवातीस दीपप्रज्वलन करून गणेश पूजन व शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. बुवा संजय पवार आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचेही त्यांचे शिष्यगण व  भजन मंडळींनी गुरुंचीपूजा समजून त्यांची पादपूजा करून दोन्ही उभयतांवर पुष्पवर्षाव करण्यात आला. . 


        या दिनानिमित्त अनेक भजनी बुवांनी आपली भजन कला सादर केली. गावदेवी भजन मंडळांचे बुवा श्री. संजय वासुदेव पवार यांचे गुरुवर्य भजन सम्राट श्री. भगवान लोकरे यांच्या सुस्वर भजनाने सुरुवात करण्यात आली.



         आषाढी एकादशी निमित्ताने भव्य कार्यक्रम आयोजित मराठा मंदिर डोंबिवली पश्चिम येथे आषाढीदिनाचे औचित्य साधून वर्धापनदिन निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेक बुवांनी आपल्या सुमधुर आवाजात अभंग रुपी हरीभजन गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. 


       गावदेवी प्रासादिक भजन मंडळाचे प्रमुख बुवा संजय वासुदेव पवार यांचे गुरुवर्य भजनसम्राट भगवान लोकरे बुवांनी प्रथम भजनाला सुरुवात केली, भगवान लोकरे बुवा  हे कोकण कलाभूषण वै. चंद्रकांत कदम बुवांचे शिष्य आहेत, कदम बुवांच्या पहाडी आवाजप्रमाणे लोकरे बुवांनी आपली भजन कला सादरीकरण केले, लोकरे बुवांचे भजन ऐकताना जणू काय कदम बुवांच्याच आवाजाप्रमाणे भजन कानाला ऐकू येत होते. 


        त्यानंतर डोंबिवलीतले बुवा प्रकाश चिले बुवा , आंनद मेस्त्री बुवा,सुनील दातार बुवा,संतोष नांदोस्कर बुवा, दादा परब बुवा,अशा अनेक बुवांनी एक- एक अभंग सादरीकरण केले. यातून रसिक प्रेक्षकांना भक्तीमय असा आनंद मिळाला. 

    यात विशेष आकर्षण म्हणजे बुवा संजय पवार यांचे चिरंजीव सुयोग् संजय पवार या अवघ्या 13 वर्षाच्या मुलाने मृदुंग वाजवून भजनी बुवांना साथ दिली. लहान वयात केलेल्या या वाद्य वाजवण्याच्या कलेचे रसिक प्रेक्षकांना मध्ये त्याचे कौतुक होत आहे. 



        या कार्यक्रमात विशेष अतिथी आमदार रवींद्र चव्हाण हे होते, त्यांनी या कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. 

   

 सन्माननिय अतिथी नगरसेवक दीपेश म्हात्रे, विकास म्हात्रे, तसेच समाजसेवक कृष्णा पाटील, ऍड. प्रदीप बाविस्कर, लोकसेवा समितीचे अध्यक्ष बाळा परब, पत्रकार नाटेकर, भजन प्रसारक, पांडुरंग कुंटे, सदानंद पवार, पखवाज वादक कृष्णा लाड, दिलीप धुरी बुवा,विठ्ठल परब बुवा, सुशील गोठणकर बुवा, दूर्वास गुरव बुवा, जनार्दन पेडणेकर बुवा,सुनील कदम बुवा, गावडे बुवा, चंद्रकांत जाधव बुवा,मुकेश लोकरे बुवा,दिपक साळसकर बुवा, स्वप्नील मेस्त्री बुवा, व इतर अनेक जण उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या