डोंबिवली पश्चिम कडे असलेल्या जनगणमन स्कूल मध्ये शुक्रवारी 17 तारीख ला फादर डे मोठ्या उत्साहात साजरा
एखाद्या कामात एखादी व्यक्ति जेव्हा उत्कृष्ट किंवा वेगळेपण असलेले कर्तव्य करते त्यावेळी त्या व्यक्तिला काय तो "बाप माणूस" असे म्हणून संबोधले जाते.खऱ्या अर्थाने "बाप माणूस"हा शब्दच अभिमानास्पद आहे. बाप म्हणजेच वडील. वडिलांबद्धल प्रत्येक मुलाच्या मनी आदर,प्रेम, मैत्रिची भावना असते आणि मुलांबद्दल ही वडिलांना मुलाची काळजी, तळमळ,किंवा त्याच्या कर्तव्यविषयी कुतूहल हे असते. जरी आईप्रमाणे त्यात देखावा नसेल, परंतु मनातल्या मनात प्रत्येक मुलामुलीविषयी वडिलांच्या मनात त्या भावना तरळत असतात आणि म्हणूनच 19 जून हा फादर डे म्हणून साजरा करण्यात येत असतो.
या कार्यक्रम प्रसंगी, राजकुमार कोल्हे सर व सचिव सौ. प्रेरणा कोल्हे यांनीही मुलांना फादर डे विषयी माहिती दिली तसेच लोकसत्यवाणी न्युज चे संपादक संतोष सावंत यांनीही वडीलाविषयीं दीन काव्यमय पंक्ती मुलांना ऐकवल्या.
सूत्रसंचालन तेजा दीदींनी उत्कृष्ट रीतीने पार पाडले. शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते






0 टिप्पण्या