बाप

 बाप



  बाप हे दोनच शब्द संपूर्ण घर सांभाळावयास पुरेसे आहेत

  त्यामुळेच अख्ख्या जगात ते पुरेसे आहेत

बापाविना जगात घराला घरपण नाही

बापाविना जगात कुठेही काहीही नाही...!!


अख्ख घर सांभाळायची जबाबदारी

बिनदिक्कतपणे बाप पार पाडतो

आलेल्या प्रत्येक संकटाला तो अंगावर हसत मुखाने झेलतो...!!


स्वतः पोटाला चिमटा घेऊन तो घरच्यांना खुष ठेवतो

मनातील दुःख तोच नेहमी पोटात ठेवतो...!!


असला अशिक्षित किंवा सुशिक्षित बाप हा बापच असतो

त्याच्या सारखा अख्या जगात घरावर प्रेम करणारा कोणच नसतो...!!


शांतपणे पण ठामपणे तो पिंपळवृक्षासारखा घरावर छाया धरतो

जबाबदारीच्या ओझ्याखाली कणाकणाने तोच मरतो...!!


दु:ख मनातले मनात आतल्या आत गिळतो

घरातील प्रत्येक सदस्याला योग्य मार्गावर जाण्यासाठी दीप होऊन जळतो...!!


बाप या शब्दाचा अर्थ खूपच गहण आहे

जगात बाप सर्वजण बनतात,पण आपल्या बापासारख बनणं कुणाला जमत नाही

 बाप नावाचं रसायन हे कुणालाही न सुटलेले ते एक अद्वितीय कोडं आहे, एक कोडं आहे...!!


रचनाकार ©️®️ कवी दीप

 कल्याण प, जिल्हा ठाणे,

         महाराष्ट्र राज्य.

 मो.क्र. ८६० ५५ ६४ ८६८.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या