पाण्यासाठी महिला बसणार आमरण उपोषणास




डोंबिवली ( शंकर जाधव ) २७ गावांना पालिकेत समाविष्ट होऊन 5 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला. तरीही पालिका प्रशासन २७ गावातील  पाणीप्रश्न सोडवू शकले नाही. अनेक वेळेला आंदोलने, मोर्चे, ठिय्या आंदोलन करूनही नागरिकांना प्रशासनाकडून  उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे.अखेर एका महिलेने थेट  आमरण उपोषण करण्याचा  निर्णय घेतला.डोंबिवली पूर्वेकडील पिसवली  मधील देखमुख होम्समधील रहिवासी वंदना सोनावणे यांनी उद्या 15 तारखेपासून आमरण उपोषणास बसणार आहेत.आपल्या हक्काचे पाणी दुसरीकडे वळविण्याचा पालिका प्रशासनाला कोणी अधिकार दिलेत ? असा प्रश्न सोनावणे यांनी उपस्थित केला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या