डोंबिवली ( शंकर जाधव ) ज्यांचे फोटो नाहीत त्यांचे नाव मतदान यादीतून वगळली जातील असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते.त्यानुसार डोंबिवली विधानसभा मतदार संघातील १ लाख १७ हजार मतदारांची फोटो नसल्याने त्यांची नावे मतदान यादीतून वगळल्यात आली आहे.याबाबत भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांसह पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली पश्चिमेकडील नायब तहसीलदारांना भेटण्यासाठी गेले होते.त्यावेळी मतदान यादीत एवढे मतदार मतदानापासून वंचित राहणार असल्याची वास्तविकता समोर आली. विधानसभा व लोकसभा मतदान संघाच्या निवडणुकीत डोंबिवलीतुन 40 टक्यांपेक्षा कमी मतदान होते.यात आता १ लाख मतदार कमी होणार असल्याने आगामी निवडणुकीत डोंबिवलीतून मतदानाचा टक्का आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली जाते.हा फटका सर्व राजकीय पक्षांना बसणार असून यावर निवडणूक आयोगाने वेळीच लक्ष दिले पाहिजे असे भाजप जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी सांगितले.
निवडणुक आयोगाने ज्यांचे फोटो नाहीत अश्या मतदारांची नाव वगळण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या नुसार 1 लाख 17 हजार नाव डोंबिवली 143 मतदार संघातुन वगळलेली आहेत.
निवडणुक आयोग 10 ते 15 दिवस देणार होते फोटो नसलेले वगळलेली नावांचे पुन्हा फॉर्म भरण्यासाठी पण तो ही कार्यक्रम लावला नाही.
मतदान हा सर्वसामान्यांचा अधिकार आहे. आता आहेत त्या सर्व मतदारांना मतदान करण्याची मुभा मिळावी, मतदान करणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून निवडणूक आयोगाने मतदानातून कोणालाही वंचित ठेवू नय, कारण ही किचकट प्रक्रिया असून मतदार याद्या वेळोवेळी अपडेट करणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. अनेक अशिक्षित, बाहेरगावी गेलेले, नागरिक ह्यांपर्यंत हा विषय अजून पोहचला देखील नाही.
यासंबंधी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी भाजपा कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष श्री. शशिकांतजी कांबळे ह्यांनी केली.


0 टिप्पण्या