कल्याणातील भूमिका सावंतने मिस इंडिया ग्लोबलच्या मुकुटावर कोरले नाव



कल्याण ( शंकर जाधव ) वाशी येथे पार पडलेल्या  टॅलेटीका या सर्च  स्पर्धेत कल्याणातील भूमिका सावंत या तरुणीने मिस इंडिया ग्लोबलच्या मुकुटावर स्वताचे नाव कोरले. तिच्या या यशाचे कल्याणात कौतुकाचा वर्षाव होत आहे.२४ स्पर्धका मधून (१२ तरुण १२ तरुणी) मधून तिची मिस इंडिया ग्लोबल या किताबासाठी निवड केली. या किताबाच्या अंतर्गत भूमिकाचा “ मिस इको टुरिझम नायजेरिया” या स्पर्धेतील सहभाग निश्चित झाला आहे.

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कॉन्स्टेबल असलेल्या विठ्ठल सावंत यांची भूमिका हि धाकटी मुलगी. लहान पणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. भूमिका  ८ वीत असताना नृत्य सादरीकरण करताना टलेटीका सर्च या संस्थेने हेरले. यानंतर तिचे प्रशिक्षण सुरु झाले. वेगवेगळ्या टप्प्यावर प्रशिक्षण घेतानाच तिने आपले शिक्षण सुरु ठेवले होते.  एकीकडे अभ्यास आणि जिम, ग्रुमिंग, डाएटीग सेशनवर लक्ष केंद्रित करतानाच भूमिका हीने या स्पर्धेला सामोरी जाण्याची तयारी केली होती. अशा दोन कोणत्या गोष्टी आहेत ज्या एखाद्याला सर्वश्रेष्ठ मॉडेल बनविण्यासाठी आवश्यक आहेत या प्रश्नावर उत्तर देताना तितकीच प्रगल्भता दाखवत  भूमिका हिने आत्मविश्वास महत्वाचा आहे. अति आत्मविश्वास नसावा मात्र आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य ते शक्य करता येते आणि त्याच्याच जोडीला दुसऱ्याला कमी न लेखता प्रत्येकात एक वेगळेपण आहे हे लक्षात घेत आपल्या स्पर्धकाला आपल्या पेक्षा कमी लेखण्याचा प्रयत्न न करणे हीच चांगल्या मॉडेलची वैशिष्ट्य असल्याचे तिने सांगत उपस्थिताची दाद मिळवली. भूमिका हिने वाशी येथे रंगलेल्या स्पर्धेत मिस महाराष्ट्र म्हणून सहभागी झाली होती.  आपण इतकी वर्षे केलेल्या मेहनत आई वडिलाकडून मिळालेले प्रोत्साहन यामुळेच  आपण आत्मविश्वासाने या स्पर्धेला सामोरी जात यशाला गवसणी घातली असून मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे आपले स्वप्न असल्याचे ती सांगते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या