डोंबिवलीत प्रथमच आगरी वधू-वर समाज सामुहिक विवाह सोहळा संपन्न




 डोंबिवली ( शंकर जाधव ) आगरी समाजाचा विवाह म्हणाला कि, भरपूर खर्च असे म्हटले जाते. आगरी समाजाच्या लग्न सोहळ्यात सुरु झालेल्या नवनवीन अनावश्यक खर्चिक पद्धतीत सुधारणा होण्यासाठी आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवलीच्या वतीने डोंबिवलीत प्रथमच आगरी वधू-वर सामुदायिक विवाह सोहळा शनिवारी डोंबिवली पूर्वेकडील पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या आवारात पार पडला. या विवाह सोहळ्यात ७ जोडल्याचे लग्न कल्याण-डोंबिवलीतील अनेक राजकीय नेतेमंडळी आणि आगरी समाजसमोर झाले. समाजाने याचा आदर्श घेऊन यापुढे संस्थेला सहकार्य करत पुढे यावे अशी विनंती संस्थेने केली आहे.



शनिवारी सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटाच्या शुभमुहूर्तावर या सात जोडल्याचे लग्न लागले. आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवली २०१९ पासून पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा सुरु केली होती. मात्र संस्थेला कोरोना महामारीत आपला हा सामाजिक उपक्रम दोन वर्ष बाजूला ठेवला लागला होता. मात्र या काळातही संस्थेने आपला उद्देश यशस्वी करण्यासाठी आगरी समाजातील मान्यवरांच्या भेटी घेणे सुरूच ठेवल्याची माहिती काळू कोमास्कर यांनी दिली. करोनाचे संकट सुरु झाल्यावर शनिवारी आगरी वधू-वर समाज सामुहिक विवाह सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यात संस्थेचे मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील, कॉंग्रेस पदाधिकारी संतोष केणे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांसह संस्थेचे पदाधिकारी अॅड. तृप्ती पाटील, गजानन पाटील, जगदीश ठाकूर, मधुकर माळी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी प्रत्येक जोडल्यास १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. तर मराठावाडा विदर्भ रहिवाशी सेवा संस्था कल्याण-डोंबिवली च्या वतीने अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी वधू-वरास संसार उपयोगी भांडी भेट म्हणून दिली. या सोहळ्यास आगरी समाजातील अनेकांनी आर्थिक सहकार्य केले. यावेळी मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील म्हणाले, मी आगरी समाज प्रबोधन संस्था (डोंबिवली) ला  धन्यवाद देतो. या संस्थेने पुढाकार घेऊन समाजात वेगळा आदर्श निर्माण केला. आगरी समाजात लग्न कार्यात खूप पैसा होतो. पण यासंस्थेने लोकांमध्ये सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे त्यातील जोडप्यांना शुभेच्छा  देतो.  संस्थेने पुढील वर्षाच्या सामुद्यिक विवाह सोहळ्यासाठी आतापासूनच तयारी करण्यास सुरुवात करा. मी आगरी समाजाला विनंती करतो कि आपण एक पाउले पुढे टाकत साखरपुडे मर्यादित करा. तर कॉंग्रेस पदाधिकारी संतोष केणे यांनीही संस्थेचे आभार मानले. सूत्रसंचालन विवेक फोरजी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या