मैदानात खेळताना १४ वर्षीय मुलाची भरधाव गाडीच्या धडकेत जागीच मृत्यू

 मैदानात खेळताना १४ वर्षीय मुलाची भरधाव गाडीच्या धडकेत जागीच मृत्यू


डोंबिवली ( शंकर जाधव ) मैदानात खेळताना एका १४ वर्षीय मुलाचा भरधाव  गाडीच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुलात घडली.भरधाव वेगाने गाडी चालविणाऱ्या वाहनचालकास मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.आजच त्याचा वाढदिवस असल्याने सायंकाळी आई- वडिलांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी तयारी केली होती.


 पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,प्रशांत दिलीप मिश्रा ( १४ ) असे मृत्युमुखी पावलेल्या मुलाचे नाव आहे.यात वाहनचालक जयेंद्र रवींद्र नेरलेकर ( २५,रा.सदगुरू कृपा आपर्टमेंट, आजदेपाडा , डोंबिवली पूर्व ) असे अटक आरोपीचे नाव आहे.डोंबिवली पूर्वेकडील आजदेपाडा येथील साईमाऊली इमारतीत दिलीप मिश्रा राहतात.मिश्रा यांचा मुलगा प्रशांत  हा शुक्रवारी
सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास प्रशांत डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुलात क्रिकेट खेळण्यासाठी गेला.या मैदानात जयेंद्रने आपली चार चाकी वाहन भरधाव वेगाने चालवत होता.निष्काळजीपणे वाहन चालवत असताना प्रशांतला जोरदार धडक दिली.यात प्रशांतचा जागीच मुत्यु झाला.


  मैदानात मुलांचा जीव सुरक्षित नाही...

खेळण्यासाठी राखीव असलेल्या मैदानात गाडी चालविण्यास परवानगी दिलीच कशी जाते असा प्रश्न या घटनेनंतर नागरिक विचारीत आहेत. याच मैदानात पालिकेच्या परवानगीने समारंभ , लग्न, महोत्सवासमैदान दिले जाते.त्यामुळे क्रीडा संकुलात नेहमीच वाहनांची ये- जा सुरू असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या