संदप येथील खदानी जवळच 5000 लिटर्स क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था

 संदप येथील खदानी जवळच 5000 लिटर्स क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्यांची  व्यवस्था



डोंबिवली ( शंकर जाधव ) ७ मे रोजी डोंबिवलीजवळील देसलेपाडा येथील  एका कुटूंबातील ५ जणांचा  संदप व भोपर मधील खदानीच्या पाण्यात बुडून  मृत्यू झाल्याची घटना घडली होती. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशान्वये देसलेपाडा येथील 

गायकवाडी परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ठिकाणी  नागरिकांसाठी  यापूर्वीच  पाण्याच्या दोन टाक्यांची व्यवस्था करण्यात आली होती. आणि आता महापालिकेने संदप येथील खदानी जवळच 5000 लिटर्स क्षमतेच्या दोन टाक्या बसविल्या आहेत खदानी मधील पाणी 2 एचपी क्षमतेच्या पंपाद्वारे सदर टाक्यांमध्ये पाणी साठविले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या