कोरोना योद्ध्यांना नोकरीवर घ्या...

आम आदमी पार्टीचे कल्याणात मूक मोर्चा 




डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना काळात ४५५ कोरोना योद्ध्यांनी जीवाची बाजी लावून काम केले.त्यांना काम बंद करण्यास पालिका प्रशासनाने लेखी कळविले .मात्र आम्हाला बेरोजगार करू नका असे म्हणत कोरोना योद्ध्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केली होती. सरकार या कोरोना योद्ध्यांना पाठीशी राहण्यासाठी आम आदमी पार्टीने सहकार्य करण्याचे ठरविले आहे.कल्याण डोंबिवली मधील कोरोना योद्ध्यांना पुन्हा नोकरीवर घ्यावे आणि बंद पडलेल्या हॉस्पिटल मधील वार्ड उपचारासाठी चालू व्हावे या मागणीसाठी  आदमी पार्टी सोमवारी सकाळी साडे दहा वाजता कल्याणात  मूक मोर्चा काढणार आहे.


   आम आदमी पार्टी तोंडावर पट्टी लावून कल्याण पछीम मधील रुक्मिणी बाई हॉस्पिटल ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका पर्यंत पदयात्रा करणार आहेत. सरकारने कोरोना योद्ध्यांवर झालेल्या अन्याय तसेच सरकारी हॉस्पिटलच्या अवस्थेवर  मूक मोर्चा काढणार आहे.या मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या