बावनचाळीतील कचरा प्रश्न मार्गी लावा अन्यथा पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात कचरा टाकू.... मनसेचा इशारा
डोंबिवली ( शंकर जाधव) डोंबिवली पश्चिमेकडील बावनचाळीत रस्त्याच्या कडेला नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्याला आग लागल्याच्या घटना घडल्या.याबाबत पालिकेने लक्ष दिले नसल्याने मनसेने पालिका प्रशासनाला जाब विचारल्यासाठी मनसेने 'ह'प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांची भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी मनसे शहर सचिव संदीप (रमा) म्हात्रे, विभाग अध्यक्ष श्रीकांत वारंगे, विभाग अध्यक्ष विजय शिंदे,शाखा प्रमुख कदम भोईर, उपशाखा अध्यक्ष - सागर मुळे,उपशाखा अध्यक्ष हर्षल सावंत,प्रभाग क्र ४८ बावन्नचाळ (गणेशनगर) प्रेम पाटील (महाराष्ट्र सैनिक) आदी उपस्थित होते.बावनचाळीच्या आजपास राहणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता पालिकेच्या घंटागाडीत ओला- सुका कचरा वर्गीकरण करूनच टाकावा अशी विंनती केली आहे.तर पालिकेने बावनचाळीच्या परिसरात रस्त्याच्या कडेला पडलेल्या कचरा प्रश्न मार्गी लावा अन्यथा पालिकेच्या पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात कचरा टाकू असा इशारा दिला आहे.
बाईट - प्रेम पाटील
श्रीकांत वारंगे

.jpeg)
0 टिप्पण्या