त्या तीन तोफा..!



ब्रह्मदेश (म्यानमार) च्या थिबा राजाचे  रत्नागिरीतील निवासस्थान थिबा पॅलेस हे एक पर्यटकांचं आकर्षण आहेच आणि पर्यटकही चांगल्या संख्येने भेटी देत असतात. स्वच्छ, सुंदर, उत्तम प्रकारे राजवाडयासह सभोवारचा परिसर राखलाय, जोपासलाय याद वाद नाही मात्र राजवाडा प्रांगणात माती खात अवास्तव उघड्यावर पडलेल्या जुन्या तीन तोफा लक्ष वेधून घेतात, हा बहुमोल ठेवा मातीमोल होण्या पेक्षा त्यांची योग्य ती देखभाल, रंगरंगोटी, तेलपाणी करून आकर्षकरित्या राजवाड्याच्या दर्शनी भागात ठेवल्यास तेही चांगल्या प्रकारे आकर्षण तयार होईल शिवाय संबंधित प्रशासनाने थिबा राजाच्या संदर्भातील ग्रंथ, चरित्र, माहिती पुस्तिका विक्रीस ठेवावेत,  पर्यटकांसाठी उपयुक्त होईल.

विश्वनाथ पंडित

ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक

चिपळूण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या