शिवतीर्थ रायगड (विश्वनाथ पंडित ) हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४२ व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचा कवड्याची माळ, धारकरी पगडी आणि भंडारा सन्मानपूर्वक देऊन शिवतीर्थ रायगड येथे सन्मान करण्यात आला, सिंधीया यांनी तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी राज्याच्या विविध गावातून सुमारे सत्तरहून अधिक तानाजी मालुसरे यांचे वंशज पुण्यभूमी रायगड येथे एकवटले होते. २5 एप्रिल १८९६ या दिवशी लोकमान्य टिळक यांच्या उपस्थितीत तानाजी मालुसरे व येसाजी कंक यांच्या वंशजांचा सत्कार रायगडावर करण्यात आला होता त्यानंतर 170 वर्षांनी पुन्हा एकदा मालुसरे वंशजांचा सत्कार शिवतिर्थ रायगडावर करण्यात आला. सर्वश्री रवींद्र तुकाराम मालुसरे (अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ), अनिल मालुसरे, सुभाष मालुसरे, नितीन मालुसरे, प्रदीप मालुसरे,ं आबासाहेब मालुसरे आणि अन्य मालुसरे वंशजांचा ज्योतिरादित्य यांनी गौरव केला.
पुण्यतिथी निमित्ताने महाराजांना पोलिसांनी मानवंदना दिली तर राजसदरे पासून शिवसमाधी पर्यंत राजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी आमदार भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, रघुजीराजे आंग्रे, सुधीर थोरात, पांडुरंग बलकवडे, त्रिंबक पुरोहित, संतोष कदम आदी अनेक मान्यवर महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर उपस्थित होते.
आधुनिक महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी कोणतेही योगदान देण्याची आमची तयारी असेल असे मालुसरे वंशजांनी सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.


0 टिप्पण्या