अश्विनी पार्क वाघोदा शिवार नंदुरबार येथे माता रमाई जयंती साजरी

 अश्विनी पार्क वाघोदा शिवार नंदुरबार येथे माता रमाई जयंती साजरी 



दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी अश्विनी पार्क वाघोदा शिवार नंदुरबार येथे माता रमाई जयंती महिलांनी स्वतः नियोजन करून साजरी केली. बहुजन समाजातील स्त्रियांचे अशा प्रकारे माता रमाई जयंती स्वतः पुढाकार घेऊन साजरी करणे हे बहुजन समाजासाठी सुखद धक्का म्हणावा लागेल व येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी सुध्दा असेल यात शंका नसावी.जयंतीनिमित्त आयुष्यमती मीनाक्षी मराठे ,आयुष्यमती सीमा जयेश भामरे, आयुष्यमती वनिता हेमकांत मोरे, आयुष्यमती प्रेममाला भाऊसाहेब कुवर, आयुष्यमती सुलक्षणा संदीप जावरे, व आयुष्यामतीअनिता परमेश्वर मोरे यांनी माता रमाई यांच्या जीवन कार्याविषयी आप - आपले मनोगत व्यक्त केले .

आभार प्रदर्शन आयुष्यमती रागिनी गौतम आहिरे यांनी केले .जयंती कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन आयुष्यमती कल्पना संदीप मानकर ,आयुष्यमती हेमलता योगेंद्र पाडवी, आयुष्यमती  आशा किशोर भिलावे,  आयुष्यमती चंद्रकला रमेश बिरारे ,आयुष्यमती प्रमिला रमेश सूर्यवंशी ,आयुष्यमती माया दीनेश सामुद्रे, आयुष्यमती शोभा सामुद्रे  आयुष्यमती मालचे ताई , आयुष्यमती पवार ताई यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या