जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचा गौरवशाली उपक्रम , शिवसेना भवनात राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार



जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचा गौरवशाली उपक्रम
==================
शिवसेना भवनात राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार
        मुंबई- दि.१२, कोविड काळात राज्यभरातील शाळा बंद असतानाच बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभागाने " शाळा बंद पण शिक्षण सुरू " या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय ऑनलाईन शिक्षण युट्यूब व झूम ॲप च्या माध्यमातून सुरू केले होते. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील इ. १ ली ते ८ वी पर्यंतच्या  हजारो गरीब व गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता आला.
         मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शेकडो शिक्षकांनी स्वतःच्या वर्गअध्यापनासोबतच या राज्यस्तरीय ऑनलाईन शिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकाची अतिरिक्त भूमिका बजावून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देऊन ख-या अर्थाने एकप्रकारे कोविड योध्दयाची भूमिकाच त्यांनी बजावली होती. परंतू त्यांच्या  या गौरवशाली कार्याची दखल अद्यापपर्यंत तरी कोणीही घेतली नव्हती. मात्र जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेच्या वतीने अशा तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन संघटनेचे सभासद असलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम   शिवसेना भवन, दादर येथे मोठ्या आनंदात व उत्साहात कोरोनाचे सर्व नियम पाळून आयोजित करण्यात आला होता.
        या कार्यक्रमात  संघटनेचे प्रमुख सल्लागार मा.श्री.जितेंद्र जानावळे, संस्थापक अध्यक्ष श्री.विजय पाटील, सरचिटणीस श्री.संदीप परब, कार्याध्यक्ष श्री.सुनिल सुर्वे, खजिनदार श्री.रामदास हंजनकर, कार्यालयीन चिटणीस श्रीम. गीता राणे तसेच रायगड जिल्हा युनिटचे जिल्हाध्यक्ष श्री.नरेश मोकाशी, सरचिटणीस श्री.बबन पाटील, कार्याध्यक्ष श्री.निर्भय म्हात्रे, उपाध्यक्ष श्री. रमणिक म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत  तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा युनिटच्या पदाधिका-यांचेही सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच काही विशेष सत्कारही करण्यात आले. यावेळी मा.जितेंद्र जानावळे यांच्या हस्ते सुट्टयांच्या यादीचे प्रकाशनही करण्यात आले. 
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस श्री.संदीप परब यांनी केले. तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक भरत पाटील, संतोष शिंदे, दिनेश अंकुश व माधुरी जोशी यांनी आपले अनुभवही कथन केले. तसेच श्री.निर्भय म्हात्रे, श्री. नरेश मोकाशी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.विजय पाटील व प्रमुख सल्लागार मा.श्री.जितेंद्र जानावळे यांनी आपल्या मनोगतातून  उपस्थित सत्कारमूर्ती यांना मार्गदर्शन केले तसेच शब्दसुमनांनी कौतुकही केले.  
   शिवाई विद्यामंदिर शाळेतील सहा.शिक्षिका श्रीम. अश्विनी कानोलकर यांनी कार्यक्रमाचे  प्रभावीपणे सूत्रसंचालन केले.
      उपस्थित सर्वच सत्कारमूर्ती यांनी समाधान व्यक्त करून संघटनेने आमच्या कार्याची दखल घेऊन शिवसेना भवन सारख्या पवित्र वास्तूत  आमचा सत्कार केला याबद्दल आभार व्यक्त केले. अशा संघटनेचे आम्ही सभासद आहोत याचा आम्हाला अभिमान आहे अशी भावनाही व्यक्त केली. 
शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या