मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा नको - दत्ता कडू पाटील
देवळाली प्रवरा - दि. १५ फेब्रुवारी
Fb गावगाडा लिहताना माजी सनदी अधिकारी तथा देवळाली हेल्प टीम चे प्रमुख दत्ता कडू लिहतात की ऐन परीक्षेच्या कालावधीत मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा व्हायला नको याकडे ध्यान देणे गरजेचे आहे..
गावगड्यात ते म्हणाले की, आज दैनीक सार्वमतमध्ये ग्रामीण आयपीएलविषयी बातमी वाचली. देशाच्या आयपीएलप्रमाणे ग्रामीण भागात याचे लोण पसरणे. तशी चांगली गोष्ट आहे. यातुन खेळाडु घडतील. आयोजकांचा जो काही हेतु असेल तोहि साध्य होईल. खेळ झाले पाहिजेत. परंतु येत्या ४ मार्चपासून बारावीची बोर्डाची परिक्षा सुरु होत आहे. नंतर १५ पासुन दहावीची. मुलांचे करियरचेदृष्टीने या परिक्षेचे महत्व किती आहे. तुम्ही जाणतां. त्यानंतर नववी व त्या खालील इयत्तांच्या परिक्षा एप्रिलमध्ये होतील. एकंदरीत परीक्षांचा हा मौसम आहे. त्यात क्रिकेटमध्ये हिच तरुणाई असते. जे नसतील ते सामने पहातात. परिक्षेमुळे त्यांना त्याचा आनंद घेता येणार नाही. घेतला तर परिक्षेवर परिणाम होंईल. खरं आयेजकांनी मे, दिवाळी सुट्टी न् नाताळाचे सुट्टीत हे सामने आयोजित केले पाहिजे. खेळहि होईल न् मुलांचा अभ्यास. नाहीतर तुमचा होईल खेळ. आधीच कोरोनाने शैक्षणीक घडी पुर्णपणे विस्कटली आहे. त्यात सार्वजनीक कार्यक्रमामुळे तिचा खेळखंडोबा होणार नाही. याची काळजी समाजधुरीणांनी घ्यावी, हि माफक अपेक्षा.
0 टिप्पण्या