आज विश्वकर्मा जयंती महोत्सव

 चेंबूरच्या नागेश पाटील वाडीमध्ये आज  विश्वकर्मा जयंती महोत्सव 



मुंबई  - चेंबूरच्या  घाटले गाव  परिसरातील नागेश पाटील  क्रमांक एक  येथे विश्वकर्मा समाज  मंडळातर्फे  उद्या  सोमवार १४ फेब्रुवारी रोजी भगवान श्री  विश्वकर्मा जयंती महोत्सवा निमित्त  विविध  धार्मिक कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले आहे.


दरवर्षीप्रमाणे यंदाही विश्वकर्मा  जयंती निमित्त  उद्या दिवसभरात विश्वकर्मा प्रभूस अभिषेक, सत्यनारायण  महापूजा, श्रींची महाआरती,महाप्रसाद, हळदीकुंकू समारंभ, वधूवर मंडळाचे उद्घाटन आणि संगीत भजन आदी  भरगच्च  धार्मिक  कार्यक्रम पार पडणार आहेत.त्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची  उपस्थिती लाभणार आहे. तरी परिसरातील  सर्व  स्तरातील नागरिकांनी या  संपूर्ण सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राजेश  पांचाळ,सेक्रेटरी दिपक  झाडेकर आणि खजिनदार श्रीकृष्ण मेस्त्री यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या