डोंबिवलीतील नांदिवली येथील बूस्टर पंप व अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई

डोंबिवलीतील नांदिवली येथील  बूस्टर पंप व अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई 
 डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली गावातील पाणी प्रश्नाबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली, महापालिकेचा इतर अधिकारी वर्ग तसेच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन  व इतर अधिकारीबरोबर  बैठकी पार पडली. नांदिवली परिसरात सुरळीत पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेतर्फे बूस्टर पंप व अनधिकृत नळ कनेक्शन यांच्यावर  कारवाई करणेबाबत चर्चा झाली होती. सदर चर्चेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार  दुपारनंतर लगेचच नांदिवली टेकडी या परिसरात जाणाऱ्या, पाईपलाईन जोडणी असणाऱ्या  इमारतीवर अचानकपणे कारवाई करून एकूण १० बूस्टर पंप महापालिकेतर्फे जप्त करण्यात आले. सदर कारवाई पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता  किरण वाघमारे, उप अभियंता शैलेश कुलकर्णी व कनिष्ठ अभियंता मोरेश्वर राणे , पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी व  पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या