नवाब मलिकांबाबत भूमिका स्पष्ट करावी
पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. शिंदे यांना आमदार चव्हाण यांचा प्रश्न
डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यावर राज्यभर शिवसेना-राष्ट्रवादी- कॉंग्रेसने निदर्शने करण्यास सुरुवात केली. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना प्रश्न विचारत नवाब मलिकांबाबत भूमिका स्पष्ट करावी असा प्रश्न भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तर आतच हिंदुत्व बदलल आहे असा टोला शिवसेनेला लगावला. हसीना पारकरशी व्यवहार करणारा मलिक हा आता शिवसेनेचा देखील रोल मॉडेल झाला आहे का? असा प्रश्नही विचारण्यात आला.
शनिवारी दुपारी डोंबिवली पत्रकार कक्षात आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषदे घेतली. यावेळी आमदार चव्हाण म्हणाले, पालकमंत्री एकनाथ शिंदे हे युतीत पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आले याचा त्यांना विसर पडू नये पत्रकार परिषदेत सांगितले. आमदार चव्हाण यांनी नवाब मलिक यांना देशद्रीही म्हणत यासंदर्भात भूमीका स्पष्ट करावी केली पाहिजे. मुंब्रा, कुर्ला संस्कृतीशी शिवसेना एकरूप झाली आहे. गिरगाव, दादर,पार्ले, ठाणे, डोंबिवलीच्या मराठी नागरिकांना वाऱ्यावर सोडून त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेवर घाव घालून आणि मुख्यतः शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा शिंदे विसरले का? असा प्रश्नही चव्हाण यांनी विचारला. हसीना पारकरशी व्यवहार करणारा मलिक हा आता शिवसेनेचा देखील रोल मॉडेल झाला आहे का? १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेप भोगत असलेल्या शहवली खानसोबत मलिकांचे थेट व्यावहारिक संबंध असल्याची कागदपत्रे मिळाली आहेत.

0 टिप्पण्या