भाजपचे दिव्यात 'वॉटर मीटर गटर' निषेध आंदोलन
डोंबिवली ( शंकर जाधव ) गेली अनेक वर्षे दिवा शहर पाणी टंचाईचा सामना करत आहे.दिवा शहरात लोकवस्ती वाढत असल्याने त्यातुलनेने नागरिकांना मुबलक पाणी मिळत नसल्याने दिवावासीय पुरते हैराण झाले आहेत. या परिस्थितीवर भाजपने वारंवार प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र तरीही पाणी समस्या दूर न झाल्याने अखेर भाजपने लोकांसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पार्टी दिवा शहर तर्फे गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली दिवा टर्निंग येथे 'वॉटर मीटर गटर' अशा स्वरूपाचे निषेध आंदोलन छेडणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा भाजपा शहर कार्यकारिणी सदस्य रोहिदास मुंडे यांनी दिली.
निवडणूक जवळ आली की सत्ताधारी पोकळ आश्वासनाची खैरात करीत असते. मात्र अनेक वर्षांपासून दिव्यातील परिस्थिती अतिशय वाईट आहे. माणसांसाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात शासन-प्रधासान कुचकामी ठरत आहे त्यांच्या विरोधात भाजपा निषेध आंदोलन छेडणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.आंदोलनात कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून केले जाणार असून नागरिकांमध्ये असणारा सत्ताधाऱ्यांवर संताप या निषेध आंदोलनातून व्यक्त करणार असल्याचे
ही मुंडे यांनी सांगितले.

0 टिप्पण्या