प्रजासत्ताक दिनाचे अवचित्त साधून केडीएमसीने केले पुरस्कृत
लोकसत्यवाणी : प्रविण बेटकर
डोंबिवली (ठाणे)
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने २६ जानेवारी २०२२ रोजी ७३ वा प्रजासत्ताक दिन (स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव) उत्साहात साजरा केला. राष्ट्रध्वजाला मानवंदना करीत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून देशासाठी प्राण गमावलेल्या शहिदांना मानवंदना करण्यात आली. त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मान.आयुक्त विजय सूर्यवंशी साहेब यांच्या शुभहस्ते विविध विभागातील कार्याबद्दल दिलेले कामकाज योग्यरित्या जबाबदारीने पार पाडल्याबद्दल कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आले. यावेळी उपायुक्त- रामदास कोकरे, वार्ड अधिकारी घुटे सर आदी. पालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये घनकचरा स्वच्छता विभाग - 'ग' प्रभागक्षेत्रचे मुख्य निरीक्षक- नरेंद्र धोत्रे, स्वच्छता निरीक्षक- सचिन सुर्वे यांना उत्कृष्ट कामगिरीबाबत सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच स्वच्छता निरीक्षक- प्रसाद पुजारे यांना स्वछ प्रभाग स्पर्धा अंतर्गत प्रथम क्रमांक व प्लास्टिक निर्मूलन मोहिमे अंतर्गत द्वितीय क्रमांक असे दोन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच थोर समाज सेवकांनी देशभक्तीवर माहिती दिली. "भारतमाता की जय"- "वंदे मातरम" अश्या मोठ्या जल्लोष नि उत्साहाने घोषणा करण्यात आल्या. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे कौतुक व आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.
0 टिप्पण्या