शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी 'करून दाखवलं'

  

शिवसेनेच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना चांगले दिवस 




डोंबिवली ( शंकर जाधव ) भारत देश हा कृषीप्रधान देश आहे.देशातील शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवला आणि बळीराजा सुखी व्हावा ही प्रत्येक देशवासियांची भावना आहे.पण शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नसल्याने त्याच्या डोळ्यातून पडणारे अश्रू या व्यवस्थेला लाज वाटणारी असतात.अश्या बळीरामच्या पाठीशी शिवसेना उभी राहीली.अगदी टाळेबंदी जाहीर झाल्यावरही शेतकऱ्यांचा माल विकण्याची जबाबदारी शिवसेनेने सांभाळली.डोंबिवलीत शिवसेनेने ' शेतकरी ते ग्राहक ' अशी संकल्पना राबवली आहे.

        खासदार डॉ. श्रीकांत शिंदे  व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेनेने वाढदिवसानिमित्त 'कोणतीही भाजी फक्त २० रुपये किलो व  कोणतीही पालेभाजी फक्त १० रुपये किलो  व फळ सुद्धा अर्ध्या किमतीत नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. गेली ४  वर्ष सातत्याने चालू असलेला हा डोंबिवलीतील एकमेव आठवडा बाजार आहे. आहे.या बाबत अधिक माहिती देताना युवासेना डोंबिवली शहर अधिकारी सागर रवींद्र म्हणाले, हा आठवडा बाजार चालू करण्यामागे आमचे उद्दिष्ट होते कि शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहका पर्यंत विकता यावा व आपल्या शहरातील नागरिकांना ताज्या चांगल्या दर्जाच्या भाज्या मिळाव्यात . हा आठवडा बाजार शिवसेना डोंबिवली शहर सहकार्याने  व भीमाशंकर शेतकरी गट ,निघोटवाडी मंचर यांच्या वतीने चालवला जातो.


       आठवडा बाजाराचे उदघाटन उपजिल्हा प्रमुख राजेश कदम व डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमाला युवासेना डोंबिवली विधानसभा अधिकारी सागर दुबे , विभाग प्रमुख किरण पाटील , यांनी भेट दिली. उपविभाग प्रमुख स्वप्नील वाणी , अनिष् निकम शिवसैनिक निखिल साळुंखे ,कौस्तुभ फडके , क्षितिज माळवदकर , महेश बुट्टे ,करण कोतवाल , वैभव चौधरी , अभिषेक चव्हाण, विशाल टोपले,महेश कदम यांचे विशेष सहकार्य लाभले .सदर कार्यक्रमाचे आयोजन युवासेना डोंबिवली शहर अधिकारी सागर रवींद  जेधे होते. जवळपास 3000 किलो भाजी व फळ सकाळी 8.30 ते 1 दरम्यान स्वस्त दारात वितरित करण्यात आले .

  सदर आठवडा बाजार दर रविवार व सोमवार डीएनसी शाळे शेजारी सकाळी 8 पासून असतो व दर गुरुवारी आयरे रोड  येथे पाण्याच्या टाकी शेजारी सकाळी 8 पासून असतो .

      **********************************************************

आम्ही भीमाशंकर शेतकरी गट मंचर येथून गेली 4 वर्ष डोंबिवली मध्ये सागर रवींद्र जेधे , युवासेना डोंबिवली शहर अधिकारी यांच्या सहकार्याने आमची गावची भाजी डोंबिवली येथे येऊन ग्राहकांना वितरित करीत आहोत. त्यामुळे आमच्या भाज्यांना थेट ग्राहक उपलब्ध झाल्यामुळे आम्हाला आमच्या शेतमालाचा चांगला दर मिळू लागला आहे . लॉकडाउनच्या काळात सुद्धा जेव्हा सर्व बंद होते तेव्हा आम्ही भाज्यांचे किट बनवून डोंबिवलीत पाठवत होतो सदर किट घरपोच  वितरित करण्यासाठी आम्हाला सागर रवींद्र जेधे युवासेना अधिकारी व त्यांची संपूर्ण टीम सहकार्य करत होती . सदर आठवडा बाजार मुले आम्हाला आमच्या पिकाचा चांगला भाव भेटू लागला आहे.असेच आठवडा बाजार जर सर्व शहरांमध्ये प्रत्येक ठिकाणी चालू झाले तर आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दिवस येतील . 

**********************************************************

                                 नितीन निघोट ( शेतकरी )

                               निघोटवाडी , मंचर, जिल्हा पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या