डोंबिवलीतील कलाकारांबरोबर लतादीदींचे नाते देखील घट्ट

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे वयाच्या   वर्षी निधन झाले. स्वर देवतेची स्वर यात्रा अखे वयाच्या ९३ व्य वर्षी विसावली. डोंबिवली ही. सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. याच नगरीत राहणाऱ्या अनेक कलाकारांनी लता दीदी यांच्या सोबत काम केले आहे. यापैकी राजू कुलकर्णी, विनायक कुलकर्णी आणि ज्येष्ठ छायाचित्रकार मनोज मेहता यांनी लतादीदींनी बरोबरच आठवणीला उजाळा दिला.त्यामुळे डोंबिवलीतील कलाकारांबरोबर त्यांचे नाते देखील घट्ट होते.

       डोंबिवलीतील छाया चित्रकार मनोज मेहता यांनी काढलेले लता दीदींचे फोटो दाखवायला त्यांच्या घरी गेलो असता तुम्ही दिलेला आदर मी कधीही विसरू शकणार नाही असे सांगितले. विनायक कुलकर्णी यांनी मोहन वाघ यांच्या काम करत असताना रंगमंचाची सजावट करण्याचे काम मी करत होतो. त्यावेळी अचानक लतादीदी येऊन मागे हळूच येऊन बसल्या. मी करत असलेल्या कामाची त्यांनी दखल घेत शाबासकी दिली. त्यानंतर पुढे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात रंगमंच सजवायचे काम मला दिले असा अनुभव सांगितला. यावेळी त्यांनी संगीताच्या हिन्हामध्ये लता असे नाव काढले असून संगीतातला एक सूर निखळला असे म्हणत श्रद्धांजली अर्पण केली.  तर राजू कुलकर्णी यांनी सहाय्यक ध्वनी संयोजक म्हणून लता दीदींबरोबर काम केले आल्याचे सांगत अनेक आठवणी जागवल्या. यावेळी डोंबिवलीत लता दीदींच्या  दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब या संस्थेतर्फे कार्यक्रम केला होता. यावेळी लता दीदींनी सत्कार केला होता. इतकेच नव्हे तर एका कार्यक्रमात त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकी देत मला कायम प्रोत्साहन दिले असे सांगितले. त्यामुळे डोंबिवलीतील कलाकारांबरोबर त्यांचे नाते देखील घट्ट होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या