गानसम्राज्ञी, गायिका लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 93 व्या वर्षी मुंबई तील ब्रीज कॅण्डी रुग्णालयात आज सकाळी 8 . 12 निधन झाले,
अनेक विविध मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी , राष्ट्रपती रामनाथ कोविंद, शरद पवार, व इतर अनेक मान्यवरांनी दीदी गेल्या मुळे एक संगीतातील एक पोकळी निर्माण झाली असे समजून शोक व्यक्त केला आहे,
संगीतातील देवता आज आपल्या तुन गेली असे समजून अनेक चाहते शोक व्यक्त करीत आहेत,
भारताच्या गानकोकीळा स्वरसम्राज्ञी सर्वांच्या लाडक्या दीदी लता मंगेशकरांच्या कारकीर्दीची सुरूवात इ.स.१९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे.
त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे.
भारतरत्न' पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील एम एस सुब्बलक्ष्मी ( भारतरत्न - १९९८) नंतर दुसऱ्या महिला कलाकार आहेत. हा पुरस्कार त्यांना २००१ साली मिळाला होता.
लता मंगेशकर हे नाव 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये इ.स. १९७४ ते इ.स. १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नोंदले गेले होते.
लोकसत्यवाणी न्युज च्या वतीने लता दिदींना भावपुर्ण श्रद्धांजली
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
0 टिप्पण्या