रीपाईच्या कार्यकर्ता मेळाव्यात वाद ...
कल्याण ( शंकर जाधव ) कल्याण येथील गीता सभागृहात पार पडलेल्या रिपाईच्या कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकाऱ्यांमधील वाद उफाळून आला.आगामी निवडणुकीच्या संदर्भात भूमिका घेण्यासाठी रिपाइंच्या मेळाव्यात कल्याण जिल्हाअध्यक्ष प्रल्हाद जाधव आणि डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्यात वाद झाला. शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका या परस्पर केल्या जातात. निर्णय घेताना डावलले जात असल्याचे सांगत डोंबिवली शहरअध्यक्ष गायकवाड यांनी मेळाव्यात व्यासपीठावर आक्षेप घेतला. अचानक झालेल्या या हरकतीमुळे सभागृहात क्षणभर गोंधळाची परिस्थिती झाली. यावर जिल्हाध्यक्ष जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, आमच्यात कोणताही वाद नाही.आम्ही सर्वजण एकच आहोत.

0 टिप्पण्या