मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मनसेच्यावतीने डोंबिवली येथे दशावतरी नाट्य प्रयोगांचे आयोजन ..
26 आणि 27 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांची जयंतीनिमित्ताने व जागतिक राजभाषा दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वॉर्ड क्रमांक 56 चे माजी नगरसेवक प्रकाश भोईर व वार्ड क्रमांक 52 च्या माजी नगरसेविका सौ सरोज प्रकाश भोईर यांनी उमेश नगर येथे रसिका प्रेक्षकांसाठी दशावतारी नाट्य प्रयोगाचे चे आयोजन केले होते 26 फेब्रुवारी ला पुंडलिक वालावलकर यांच्या सिंधुदुर्ग दशावतार नाट्य मंडळाने शनि प्रभाव हा प्रयोग सादर केला व तसेच 27 फेब्रुवारी रोजी प्रकाश लब्दे यांच्या श्री भगवती दशावतार नाट्य मंडळा ने असुर संग्राम हा प्रयोग सादर केला

0 टिप्पण्या