अन्यथा प्रशासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढू..डोंबिवलीतील स्मशानभूमीवर भाजपचा शिवसेनेवर निशाणा
डोबिवली ( शंकर जाधव ) करोना काळात स्मशानभूमीच्या परिस्थितीकडे नागरिकांचे लक्ष गेले. डोंबिवलीतील स्मशानभूमीच्या विषयावर भाजपने शिवसेनेवर निशाना साधला आहे.डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील शिवमंदिर जवळील स्मशानभूमीच्या रखडलेल्या कामाला प्रशासना आणि सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. येत्या एका महिन्यानंतर स्मशानभूमीच्या कामाला गती न आल्यास अन्यथा प्रशासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढू असा इशारा दिला आहे.
डोंबिवलीतील भाजप पूर्व मंडळ कार्यालयात माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना आणि पालिका प्रशासनावर सडकून टीका केली. हळबे म्हणाले, डोंबिवली पूर्वेकडील पूर्वेकडील दत्तनगर येथील शिवमंदिर जवळील स्मशानभूमीचे का अनेक दिवसांपासून रखडले आहे.या कामाचे निविदा काढल्यावर ज्या ठेकेदाराला हे काम दिले आहे, तो कल्याण-डोंबिवलीतील नाही या करणाने या ठेकेदाराला कामाच्या ६० टक्के पैकी ६ टक्केच रक्कम देण्यात आली. ठेकेदाराला उर्वरित रक्कमेसाठी पालिकेच्या चकरा माराव्या लागत आहे.स्मशानभूमिचे काम लवकरात पूर्ण झाल्यास नागरिकांचा त्रास कमी होईल.१५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून स्वच्छता हवा कार्यक्रमाच्या माध्यमातून १२४ कोटी रुपये आले आहेत.त्यातील साडेबारा कोटी स्मशानभूमीसाठी आहेत ते पैसे वापरावे असा माजी नगरसेवक हळबे यांनी सांगितले.कामाच्या ६० टक्के पैकी ६ टक्के रक्कम देण्यात आली.उर्वरित रक्कमेसाठी ठेकेदारला पालिकेच्या चकरा माराव्या लागतात.भाजपच्या वतीने पालिकेच्या आयुक्तांना याबाबतची माहिती देऊ.तरीही एका महिन्यात स्मशानभूमीच्या कामाला गती आली नाही तर डोंबिवलीत प्रशासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढू असा इशारा दिला. यावेळी डोंबिवली पूर्व मंडळ महिला आघाडी अध्यक्षा पूनम पाटील,कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजीव बिरवाडकर, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई, डोंबिवली पपूर्व माडल युवा मोर्चा अध्यक्ष मितेश पेणकर, डोंबिवली पूर्व मंडल सचिव मनोज पाटील.माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर, संदीप पुराणिक आदि पदाधिकारी उपस्थित होते.
डोंबिवली पश्चिमेकडील स्मशानभूमीचे दरवाजे नागरिकांसाठी बंद का ?
डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील शिवमंदिर जवळील स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात.पश्चिमेकडून येणाऱ्याची संख्या जास्त असते. स्मशानभूमी सर्वांसाठी खुली असावी असा नियम असताना डोंबिवली पश्चिमेकडील स्मशानभूमीचे दरवाजे पश्चिमेकडील नागरिकांसाठी बंद असतात अशी तक्रार असल्याने यावर पत्रकारांनी छेडले असता हळबे यांनी यावर चर्चा सुरु असल्याचे सांगितले. वास्तविक हि परिस्थिती अनेक वर्षापासून असून पालिकेवर अनेक वर्ष विराजमान असलेल्या शिवसेना-भाजपला मात्र जनतेचा हा प्रश्न सोडविण्यास यश आले नाही असे दिसते
0 टिप्पण्या