आर.आर.रुग्णालयातील डॉक्टरांचा राज्यपालांच्या हस्ते गुणगौरव
डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना काळात अनेक लोकांचे जीव वाचवणाऱ्या आर. आर. रुग्णालयातील डॉक्टरांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. कोव्हीड कालखंडात उत्कृष्ट सेवा,अथक परिश्रम आणि निस्वार्थ सेवा दिल्या बद्दल आर.आर. रुग्णालयाचे डॉ.अमीर कुरेशी आणि डॉ. भरत तिवारी यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
कोविडच्या पाहिल्या आणि लाटेमध्ये अनेक रुग्णांचे जीव वाचवणारे रुग्णालय म्हणून आर.आर. हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. डोंबिवली मधील पहिले कोव्हीड आय.सी.यु हॉस्पिटल म्हणून या रुग्णालयाची ओळख आहे. तसेच जवळपास ९३ % रिकव्हरी रेट या रुग्णालयाचा आहे. तसेच नॉन कोविड अनेक रुग्ण हे या रुग्णालयामधून बरे होऊन आले आहेत. याच केलेल्या कामगिरीबद्दल हॉस्पिटलचे डॉ. अमीर कुरेशी आणि डॉ. भरत तिवारी यांना राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आणि परिश्रम या संस्थेच्या वतीने कोरोना योद्धा सन्मान करण्यात आला आहे. या आधी देखील कल्याण डोंबिवली महापालिके तर्फे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते उत्कृष्ठ रुग्णांची सेवा केल्या बद्दल आर.आर.रुग्णालयाला सन्मानित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये या हॉस्पिटलवरून मोठे राजकारण झाले होते. मात्र त्या राजकारणाकडे दुर्लक्ष करत रुग्णांना योग्य उपचार आणि सेवा देण्याकडे रुग्णालय लक्ष देत आहे. कोरोना काळात पोलीस,पत्रकार,शासकीय कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षातील लोक या रुग्णालयामधून बरे होऊन आले आहेत. तसेच या रुग्णालयात ठाणे, पनवेल, अंबरनाथ, कल्याण डोंबिवली येथून रुग्ण उपचारासाठी येत असत.सध्या कोव्हीड आणि नॉन कोव्हिड या दोन्ही रुग्णांचे उपचार या रुग्णालयात केले जात आहेत.
0 टिप्पण्या