तत्परतेने आपला प्राथमिक अहवाल पोहोचविणेही गरजेचे !

 तत्परतेने आपला प्राथमिक अहवाल पोहोचविणेही गरजेचे !



 विश्वनाथ पंडित 

वेळ, दगदग, रांगा आदी टाळण्यासाठी शिवाय प्राथमिक अहवालही अल्प वेळात मिळत असल्यामुळे सेल्फ टेस्टिंग किट च्या माध्यमातून नागरिकांचा घरीच करोना चाचणी करण्याचा मानस दिसून येतोय यात वावगे काही नाही, मात्र घरच्या घरी करण्यात आलेल्या टेस्टचा अहवाल संबंधित प्रशासनापर्यंत तत्परतेने पोचविणे सुद्धा अत्यंत गरजेचे व निकडीचे असूनही परीक्षण केलेल्या नागरिकाकडून तो जातोच असं दिसतं नाही कारण मुंबईत तीन लाख टेस्ट किट विक्री झाली असतानाही प्रशासनाकडे अहवालाची नोंद केवळ एक लाखापर्यंत झाली असल्याचे वाचनात आले. हीच तर बाब गंभीर, धोकादायक, घातक  आणि संसर्गाला वाट करून देणारे ठरू शकते. एक नैतिक कर्तव्य म्हणून, एक जागरूक नागरिक या नात्याने घरी  टेस्टिंग करणाऱ्या प्रत्येकाने तेवढ्याच तत्परतेने आपला प्राथमिक अहवाल पोहोचविणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या